बंद

    सामान्य प्रशासन विभाग

    विभागाबद्दल माहिती सामान्य प्रशासन विभाग

    सर्व आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, पेंशन अदालत घेणे, पदभरती करणे, पदोन्नती , न्यायालयीन प्रकरणे, विभागीय चौकशी अनुकंपा तत्तवावर भरती, माहितीचा अधिकार, वर्ग 1 व वर्ग 2 तसेच वर्ग ३ व वर्ग ४ च्या संबंधात आस्थापणा विषयक बाबी, सर्व विभाग/कार्यालया कडून येणाऱ्या विषयाकीत नस्तीवर निर्णय, वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचारी सेवा जेष्ठता, विभागीय परिक्षा.

    परिचय

    महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जि.प.भंडारा अंतर्गत सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 मधील खालील कामे हाताळण्यात येतात.

    1. सर्व सर्वंगाच्या पदोन्नती देणे, पदभरती करणे, इतर लाभाविषयक प्रकरणे.
    2. जिल्हा परीषद अंतर्गत घेण्यात येणा-या सभेचे आयोजन करणे व नियंत्रण ठेवणे.
    3. जिल्हा परीषद अंतर्गत येणारे पं.स.स्तरावरील कामावर नियंत्रण ठेवणे.

    जिल्हा परिषद भंडाराच्या एकूण १७ विभागांपैकी सामान्य प्रशासन विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जनरल) हे या विभागाचे प्रमुख आहेत. आवश्यकतेनुसार जिल्हा परिषदेतील सर्व विभागांमधील महत्त्वाची माहिती/प्रशासकीय प्रस्ताव आणि प्रकरणांची छाननी केल्याने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भंडाराचे व वरिष्ठ कार्यालयास सादर करणे या विभागामार्फत केले जाते.

    • स्थायी समिती सभेचे आयोजन 30 दिवसाच्या आंत करणे व सभेचे कार्यवृत्त विहित मुदतीत तयार करुन सर्व संबंधित सदस्यांना उपलब्ध करुन देणे.
    • जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे आयोजन 90 दिवसाचे आंत करणे व कार्यवृत्त विहित मुदतीत सर्व सन्माननिय सदस्यांना उपलब्ध करुन देणे.
    • जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे आयोजन विहित मुदतीत करणे.
    • जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग, पंचायत समिती यांचे निरिक्षण करणे.
    • मा.आयुक्त निरिक्षण टिपणीचे अनुपालन करणे .
    • पेंशन अदालतीचे आयोजन करणे.
    • माहितीचा अधिकार अधिनियम-2005 ची अमलबजावणी करणे.
    • कर्मचा-यांचे मृत्यु पश्चात अनुकंपा तत्वावर वारसानास नियुक्तिीची कार्यवाही करणे.
    • वर्ग – 3 कर्मचा-यांना 12 व 24 वर्षाच्या लाभाची प्रकरणे तपासुन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मंजुरीस्तव प्रदान करणे.
    • शासन निर्देशाप्रमाने जिल्हा परिषदेतील विविध विभागातील रिक्त पदे भरणेस्तव कार्यवाही करणे .
    • शासन निर्देशाप्रमाने सार्वञिक बदल्यांच्या धोरणानुसार बदल्यांची कार्यवाही करणे.
    • सेवा निवृत्त कर्मचा-यांच्या प्रलंबित सेवा निवृत्त प्रकरणाचा अहवाल शासनास सादर करणे.
    • लिपीक वर्गीय कर्मचार्यांचे आस्थापना विषयक बाबी हाताळणे.
    • लिपीक वर्गीय कर्मचार्यांची सेवा ज्येष्ठता यादी अद्यावत ठेवणे.
    • लिपीक वर्गीय कर्मचार्यांची 100 बिंदु नामावली रोष्टर अद्यावत ठेवणे.
    • वर्ग १,२,३ व 4 यांच्या आस्थापना विषयक नसत्यांची तपासणी करुन निर्णयास्तव मा.मु.का.अ. यांचेकडे सादर करणे.
    • वर्ग 1 ते 4 कर्मचार्यांची शिस्तभंगविषयक प्रकरणे तपासुन मा.मु.का.अ.यांचे निर्णयास्तव पाठविणे
    • जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे.
    • पंचायत राज समिती/ मागासवर्गीय समिती व ईतर समित्यांचया भेटीच्यावेळी एकञित माहिती संकलीत करणे.
    • मा.मु.का.अ. यांच्या सभेची जिल्हयाची एकञित माहिती तयार करणे.
    • गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख यांच्या समन्वय सभेचे आयोजन करणे.
    • जिल्हा परिषद लिपीक वर्गीय संघटनेच्या बैठकांची आवश्यकतेप्रमाणे आयोजन करणे

    अधिकाऱ्यांचे नाव :- जे. ए. परब

    पद :- उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य )

    ई-मेल पत्ता :-dyceogzpbhandara@gmail.com

    पत्ता :-पहिला माळा ,जिल्हा परिषद भंडारा

    दूरध्वनी क्रमांक :- ०७१८४-२५२२६२