विभागाबद्दल माहिती
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद भ्ंडारा अंतर्गत मागासवर्गिय विद्यार्थ्यांनकरीता, दिव्यांगांकरीता व ग्रामिण क्षेत्रातील मागासवर्गीय लोकांच्या सामाजिक उन्नतीकरीता योजना राबविल्या जातात.
परिचय
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या सुपूर्त करण्यात आलेल्या दिव्यांग शाळा, मागासवर्गिय विद्यार्थ्यांचे अनुदानित वसतीगृह, मागासवर्गिय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दलीत वस्ती सुधार योजना व जिल्हा निधी २० टक्के व ५ टक्के अंतर्गत मागासवर्गिय व दिव्यांग करीता योजना राबविणे. त्याच प्रमाणे दिव्यांग शाळेचे कर्मचारी यांचे पगारभत्ते व सेवा संबंधीचे कामकाज, आंतरजातीय विवाह तसेच दिव्यांग-दिव्यांग व दिव्यांग – अव्यंग यांचे विवाह पर प्रोत्साहन अनुदान मंजूर करणे.