विभागाबद्दल माहिती
लघु पाटबंधारे विभाग, जि.प. भंडारा मार्फत जिल्हा वार्षिक योजना 2702-6695 को.प. बंधारे बांधकाम व दुरुस्ती (गैरआदिवासी), 2702-6686 ल.पा. तलावांची दुरुस्ती, ओ.टी.एस.पी. को.प.बंधारे/साठवण बंधारे बांधकाम व दुरुस्ती (आदिवासी क्षेत्रबाह्य उपाययोजना 2225 E 311 TL170008 ), जिल्हा निधी 101-27 ल.पा. योजनांची विशेष दुरुस्ती, जलयुक्त शिवार अभियान, मा.मा. तलाव पुनर्जिवन व बळकटीकरण अभियान, 13000 धडक सिंचन विहीर कार्यक्रम, जलशक्ती अभियान (कॅच द रेन) इत्त्यादी योजना राबविण्यात येतात.
परिचय
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम1961 नुसार जि.प.भंडारा अंतर्गत लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद, विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 मधील खालील कामे हाताळण्यात येतात.
- स्थापत्य अभीयांत्रिकी सहायक या संवर्गातुन जलसंधारण अधिकारी म्हणुन पदोन्नती देणे.
- जिल्हा परीषद अंतर्गत घेण्यात येणा-या ल.पा. योजनांच्या बांधकाम व दुरुस्ती समितीच्या सभेचे आयोजन करणे व नियंत्रण ठेवणे.
- जिल्हा परीषद अंतर्गत येणारे पं.स. स्तरावरील लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद, उपविभागाचे कामावर नियंत्रण ठेवणे.