बंद

    पंचायत विभाग

    विभागाबद्दल माहिती पंचायत विभाग

    जि.प. भंडारा मार्फत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाजावर संनियंत्रण ठेवण्यात येते.सदर विभागामार्फत 15 वा वित्त आयोग,जनसुविधा योजना,, नागरी सुविधा योजना अंतर्गत प्राप्त अनुदानाचे वाटप ग्रामपंचायतींना विकास कामासाठी करण्यात येते.

    परिचय

    महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमा नुसार जि.प.भंडारा अंतर्गत पंचायत विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 मधील कर्मचा-यांची खालील कामे हाताळण्यात येतात.

    1. ग्रामपंचायत अधिकारी या संवर्गातुन विस्तार अधिकारी (पं/ कृषि) या पदावर पदोन्नती देणे.
    2. जिल्हा परीषदअंतर्गत येणारे पं.स.स्तरावरील पंचायत विभागाचे तसेच ग्रामपंचायतीचे कामावर नियंत्रण ठेवणे.

    पंचायत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावपातळीवर प्रचार व प्रसिध्दी करुन  जास्तीत जास्त नागरिकांना  योजनेचा लाभ प्रदान करणे व ग्रामीण भागाचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणे.

    1. कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकासाच्या कामाचा आढावा घेणे व जेथे कामाची प्रगती समाधानकारक नाही किंवा प्रत्यक्ष जागेवर काही अडचणी निर्माण झाल्या असल्यास त्याचे निराकरण करणे.
    2. अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेली कामे व कर्तव्य समाधानकारक पार पाडतात किंवा नाही याची तपासणी करणे.
    3. क्षेत्रीय कार्यालयात व प्रकल्पस्थानी प्रशासकिय कामकाज वित्तीय व लेखाविषयक बाबी शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार होतात किंवा नाही याची पाहणी करणे.
    4. जिल्हा परिषदे मार्फत शासकीय व स्थानिक स्वरुपाच्या योजनेचा प्रसार स्थानिक लोकांशी संपर्क साधून करणे स्थानिक लोक व लोकप्रतिनिधी यांचा विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यासाठी सहयोग मिळविणे.

    वरील उद्देश साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी खालील प्रमाणात दौरे व रात्रीचे मुक्काम विहित केलेले आहेत.

    1. नागरी सुविधा,जन सुविधा योजनांची ,स्व.मातोश्री बाळासाहेब ठाकरेग्रामपंचायत बांधणी व राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान  योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.
    2. 15 वा वित्त आयोग ,नमो 11 सुत्री कार्यक्रमाअंतर्गत नमो ग्रामसचिवालय बांधकाम,नमो आत्मनिर्भर  व सौर उर्जा गाव  अभियान योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.
    3. नैसर्गिक आपत्ती अर्थसहाय्य योजना

    प्रथम अपीलीय अधिकारी – उपमुख्य कार्यकारी अधिकारी  (पं) जि.प.भंडारा

    जन माहिती अधिकारी-  कनिष्ठ प्रशासन अधिकारी

    सहाय्यक जन माहिती अधिकारी-  वरिष्ठ सहायक

    आर.आर.आबा पाटील सुंदर गांव  पुरस्कार,आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार

    अधिकाऱ्यांचे नाव :- श्री. उमेश नंदागवळी
    पद :- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं),
    विभाग :- पंचायत विभाग, भंडारा
    दूरध्वनी क्रमांक :-०७१८४-२५२३२६
    फोन नंबर :- ८२७५३९८३५६
    मेल आयडी – dyceogpzpbhandara@gmail.com