बंद

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष

    विभागाबद्दल माहिती

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जि.प.भंडारा अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जल जीवन मिशन तसेच पाणी गुणवत्ता कार्यक्रम हे केंद्र शासनाचे अभियान संयुक्तपणे राबविण्यात येतात, वरील योजनांतर्गत पंचायत समिती स्तरावरुन ग्रामपंचायत व गावस्तरावर वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे कामे, जल जीवन मिशन अंतर्गत विविध नल जल मित्र व इतर अभियानाची प्रचार प्रसिध्दी करणे, ग्रामपंचायत स्तरावरील पाणी गुणवत्ता स्वच्छता व सर्वेक्षण कार्यक्रमाचे आायेजन करणे व शासन स्तरावरुन निर्देशित इ. महत्वाचे अभियान, कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येतात.

    परिचय

    महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम1961 नुसारजि.प.भंडारा अंतर्गत जिल्हा पाणीव स्वच्छता मिशन कक्ष विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 मधील खालील कामे हाताळण्यात येतात.

    • स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनांअगर्तत विविध उपांगाची कामे जिल्हास्तरावरुन पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी करणे.
    • जिल्हा परिषद अंतर्गत जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीमार्फत शासनाच्या विविध अभियान, कार्यक्रमाची माहिती सादर करणे.
    • जिल्हास्तरावरुन स्वच्छ भारत मिशन (ग्रा), जल जीवन मिशन व पाणी गुणवत्ता कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी, विविध प्रशिक्षणे, कार्यशाळेचे आयोजन करुन शासनाच्या विविध अभियानाची अंमलबजावणी करणे.

    जिल्हा परिषद स्तरावर- प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन) तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व), कार्यालय अधिक्षक (प्रतिनियुक्तीने पूर्णवेळ), लिपीक(प्रतिनियुक्तीने पूर्णवेळ), पाणी गुणवत्ता निरीक्षक (प्रतिनियुक्तीने पूर्णवेळ)

    तसेच शासन स्तरावरुन मान्यता प्राप्त विविध विषयाचे तज्ञ / सल्लागार,अधिकारी व कर्मचारी (कंत्राटी) पध्दतीने कार्य करतात.

    पंचायत समिती स्तरावर – गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचा) यांचे प्रशासकीय नियंत्रणाखाली गट संसाधन केंद्र (पावस्व) अंतर्गत गट समन्वयक व समुह समन्वयक (कंत्राटी पध्दतीने) यंत्रणा कार्य करतात.

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जि.प.भंडारा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयाची सुविधा, स्वच्छ व  शुध्द पिण्याच्या पाण्याचे प्रत्येक घरापर्यंत नळापर्यंत पोहचविणे, तसेच गावे हागणदारीमुक्त अधिक होण्याचे दृष्टिने सर्वसमावेशक उपाययोजना व सुविधा निर्माण करणे.

    1. कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकासाच्या कामाचा आढावा घेणे व जेथे कामाची प्रगती समाधानकारक नाही किंवा प्रत्यक्ष जागेवर काही अडचणी निर्माण झाल्या असल्यास त्याचे निराकरण करणे.
    2. अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेली कामे व कर्तव्य समाधानकारक पार पाडतात किंवा नाही याची तपासणी करणे.
    3. क्षेत्रीय कार्यालयात व प्रकल्पस्थानी प्रशासकिय कामकाज वित्तीय व लेखाविषयक बाबी शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार होतात किंवा नाही याची पाहणी करणे.
    4. जिल्हा परिषदे मार्फत विविध शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण , मेळावे याद्वारे योजनेचा प्रसार स्थानिक लोकांशी संपर्क गृहभेटीद्वारे स्थानिक लोक व लोकप्रतिनिधी यांचा विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यासाठी सहयोग मिळविणे.
    5. स्वच्छ भारत मिशन (ग्रा), जल जीवन मिशन, पाणी गुणवत्ता कार्यक्रमाचे दैनंदिन कामाचे तसेच प्रगती अहवाल, तपासणी आधारे शासन संकेतस्थळावर अद्यावत नोंदी करुन वरिष्ठ कार्यालयास वेहोवेळी अभियानाची माहिती सादर करणे व सदरहु उद्यिष्टे विहित कालावधीत साध्य करण्याचेदृष्टिने सर्व आवश्यक उपाययोजना करणे.
    1. स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण)
    2. जल जीवन मिशन (प्रशिक्षण / कार्यशाळा)
    3. पाणी गुणवत्ता कार्यक्रम

    प्रथम अपीलीय अधिकारी –प्रकल्प संचालक (जजीमी) तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व)- ९४२००७२३९३

    जन माहिती अधिकारी –  कनिष्ठ प्रशासन अधिकारी (कार्यालय अधिक्षक)

    सहाय्यक जन माहिती अधिकारी- कनिष्ठ प्रशासन अधिकारी (कार्यालय अधिक्षक)

    अधिकाऱ्यांचे नाव :- श्री.माणिक एस चव्हाण
    पद :- प्रकल्प संचालक (जजीमी) तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व)
    विभाग :- लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.
    दूरध्वनी क्रमांक :- ०७१८४- २५१५८८
    फोन नंबर :- ९४२००७२३९३
    मेल आयडी – nbabhandara@gmail.com