विभागाबद्दल माहिती
कृषि विभाग, जि.प. भंडारा मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना , बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, नविन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम,व जिल्हयातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर शेती उपयोगी साहित्य पुरविणे (ताडपत्री ,पीव्हीसी / एचडीपीई पाईप) इत्यादी योजना राबविण्यात येतात.
परिचय
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम1961 नुसारजि.प.भंडारा अंतर्गत कृषी विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 मधील खालील कामे हाताळण्यात येतात.
- विस्तारअधिकारी (कृषी) संवर्गातुन कृषिअधिकारी म्हणुन पदोन्नती देणे.
- जिल्हा परीषद अंतर्गत घेण्यात येणा-या कृषि समितीच्या सभेचेआयोजन करणे व नियंत्रणठेवणे.
- जिल्हा परीषदअंतर्गत येणारे पं.स.स्तरावरील कृषि विभागाचे कामावर नियंत्रण ठेवणे.