बंद

    आरोग्य विभाग

    विभागाबद्दल माहिती

    आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा येथे एकूण 33 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 193 उपकेंद्रे, 29 आयुर्वेदिक दवाखाने, 4 ॲलोपॅथिक दवाखाने आणि 7 तालुका आरोग्य कार्यालये असून ती ॲनिमिया मुक्त भारत, आशा स्वयंसेविका योजना, आयुष, कुटुंब कल्याण, आरोग्य सेवा, आरोग्य सेवा, आरोग्य सेवा आदी उपक्रम राबवत आहेत. कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, पायाभूत सुविधा विकास कक्ष, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी राष्ट्रीय गुणवत्ता आराखडा, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, सिकलसेल रोग नियंत्रण कार्यक्रम, क्षयरोगाचे उद्रेक, संसर्गाचे स्त्रोत इत्यादी राबवले जातात.

    महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत आरोग्य विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 ची पुढील कामे हाताळली जातात.

    1) वरील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचे नियंत्रण आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर उपाययोजना करणे.

    2) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्याचा लाभ दिला जातो.

    3) आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कार्यरत संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी हाताळल्या जातात. तसेच त्यांची बदली, पदोन्नती, नियुक्ती याबाबत कार्यवाही केली जाते.

    जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी, माता.बाल संगोपन अधिकारी, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासकिय अधिकारी. साथरोग्‍ अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सहा.प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तसेच कार्यालयीन वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचारी

    तालुका स्तरावर  –        तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक

    प्राथमिक आरोग्य केंद्र स्तारावर – वैद्यकिय अधिकारी (गट-अ) व वैद्यकिय अधिकारी (गट-ब)  , आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका

    उपकेंद्र स्तरावर  –         सामुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका

    या प्रकारच्या आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सक्रीय आहेत.

    आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची ग्रामीण भागात प्रचार व  प्रसिध्दी करुन लोकांचे आरोग्यमान उंचावण्याकरीता प्राथमिक स्तरावरील आवश्यक आरोग्य विषयक सोई-सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, आयु./आग्ल. दवाखाने मार्फत पुरविणे.

    • प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र याव्दारे सुरु असलेल्या ग्रामीण भागतील आरोग्य सेवेचा नियमितपणे आढावा घेउन प्राप्त उध्दीष्टांची 100 टक्के लक्षपूर्ती करण्यासंबधाने आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही करण्यात येते.
    • ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य संस्थामध्ये होणा-या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे.
    • समाजातील सिकलसेल वाहक रुगण व्यक्ती शोधुन काढणे व त्यांनी आप-आपसात विवाह टाळावा यासाठी समुपदेश करणे.
    • क्षयरोगाचा संसर्ग वाढु नये यादृष्टीने क्षयरोगग्रस्त रुग्ण शोधून त्यांना मोफत उपचार सुविधा पुरविणे.
    • ग्रामीण भागातील आरोग्य मान उंचावण्याच्या दृष्टीने इतर आवश्यक उपाययोजना करणे.

    1)  जननी सुरक्षा योजना –

    2)  प्रधानमंत्री मात्रु वंदना योजना –

    3) मानव विकास कार्यक्रम –

    प्रथम अपीलीय अधिकारी – जिल्हा आरोग्य अधिकारी (९०२१७४६७१८)
    जनमाहिती अधिकारी – अति.जिल्हा आरोग्य अधिकारी (९०४८०७६९८)
    सहाय्यक जनमाहिती अधिकारी – प्रशासकिय अधिकारी (९०७५०९७२७)

    धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे
    1) जननी सुरक्षा योजना –
    धोरण- राज्यातील ग्रामीण भागातील दारीद्रय रेषेखालील व अनु.जाती व जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थामध्ये होण-या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे.
    मार्गदर्शक तत्वे – ग्रामीण भागातील सदर गर्भवती महिला अनु.जाती, अनु.जमाती ची असावी. इतर प्रवर्गातील गर्भवती महिला ही दारीद्रय रेषेखालील असावी. सदर लाभार्थी महिलेची वयाची अट शिथील करण्यात आली. सदर योजनेचा लाभ देतांना अपत्याची अट शिथील करण्यात आलेली आहे.
    2) प्रधानमंत्री मात्रु वंदना योजना –
    धोरण – प्रसुतीनंतर बाळाचा व आईचा सकस व पोष्टीक आहार नियमित सुरु राहावा व बाळ कुपोषीत होउ नये यादृष्टीने आहाराकरिता आर्थीक मदत देण्याकरिता सदर योजना राबविण्यात येते. या योजन अंतर्गत मिळणारा लाभ पहिल्या जिवीत अपत्याकरिता पात्र लाभार्थी महिलेस रु. 5000/- एवढी रक्कम आधार संलग्न बँक अथवा पोस्ट ऑफीस मधील खात्यात डीबीटी व्दारे तीन टप्प्यात जमा केली जाते.
    मार्गदर्शक तत्वे – ज्या महिलांचे निव्वळ कौटूंबीक उत्पन्न प्रतिवर्ष रु. 8 लाखापेक्षा कमी आहे, ज्या महिला अनु.जाती/जमाती प्रवर्गाच्या आहेत, ज्या महिला अंशता (40 टक्के) किंवा पुर्ण अपंग आहेत, ज्या महिला बीपील सिधापत्रिका धारक आहेत, ज्या महिलांकडे ई-श्रम कार्ड धारक आहेत, ज्या महिलांकडे मनरेगा जॉबकार्ड घेतलेल्या आहेत, ज्या महिला गर्भवती व स्तनपान करणा-या आंगणवाडी सेविका/ आंगणवाडी मदतनीस/ आशा कार्यकर्ती आहेत, ज्या महिला किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकरी आहेत अशा महिलांकरिता सदर योजना राबविण्यात येते.
    3) मानव विकास कार्यक्रम –
    धोरण – मानव विकास कार्यक्रम अंतर्गत तपासणी शिबीरांचे आयोजन करुन गरोदर माता / स्तनदा माता, 0 ते 6 वयोगटातील बालकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे तसेच गरोदर माता / स्तनदा माता यांना बुडीत मजुरी देण्यात येते. गरोदरपणाचे व प्रसुतीच्या काळात मातांना पुरेश विश्रांती घेता यावी जेणेकरुन माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे या धोरणाअंतर्गत्‍ सदर योजना राबविण्यात येते.
    मार्गदर्शक तत्वे – या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात जाणे आवश्यक आहे, या योजनेचा लाभ अनु.जाती/ जमाती व दारीद्रय रेषेखालील गरोदर/ प्रसुत मातांनाच देण्यात येते, योजनेचे अनुदाना प्रा.आ.केंद्राचे वैद्यकिय अधिकारी किंवा आरोग्य सेविका यांचे मार्फत दिल्या जाते, महिलेच्या 7 ते 9 महिण्याच्या गरोदरपणाच्या काळात 2000/- रुपये व प्रसुतीनंतर 2000/- रु. या प्रमाणे एकुण 4000/- रु. बुडीत मजुरीपोटी दिल्या जाते.

     

    अधिकाऱ्यांचे नाव :- श्री. मिलिंद सोमकुवर
    पद :- जिल्हा आरोग्य अधिकारी,
    विभाग :- आरोग्य विभाग,जिल्हा परिषद भंडारा
    दूरध्वनी क्रमांक :- ०७१८४- २९९४४३
    फोन नंबर :- ९०२१७४६७१८
    मेल आयडी – dhobhandara@gmail.com