जिल्हा परिषदेचा वित्त विभाग या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग १ अधिकारी असतो. मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी हे त्यांचे पद आहे. हेच अधिकारी जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सचिव आहेत. यासोबत एक वर्ग 1 अधिकारी राहतो. पंचायत समिती स्तरावर सहाय्यक लेखाधिकारी हा वर्ग 3 अधिकारी असतो.
या विभागामार्फत जिल्हा परिषदेचे आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करणे, लेखाजोखा लिहिणे, विविध निधीचा ताळमेळ घालणे, सर्व प्रकारच्या निधीचे वाटप व नियंत्रण करणे व संपूर्ण निधी विहित कालावधीत खर्च करणे, लेखा आक्षेप निकाली काढणे आदी कामे या विभागामार्फत केली जातात.
याशिवाय जिल्हा परिषदेचे निधीचे अंदाजपत्रक तयार करणे व त्यानुसार वर्षअखेरीस झालेल्या खर्चाचा ताळमेळ घालणे व हिशेब तयार करण्याचे काम केले जाते.