बंद

    महिला व बालकल्याण विभाग

    विभागाबद्दल माहिती

    महिला व बालविकास विभाग, भंडारा यांच्यामार्फत जिल्ह्यातील महिला व बालकांच्या हितासाठी विविध योजना व सेवा राबविण्यात येतात. एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना ही विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजनांपैकी एक आहे.

    महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 नुसार, महिला व बाल विकास विभाग, भंडारा मार्फत खालील कामे केली जातात:

    1. महिला आणि बाल विकास आयुक्तालय, पुणे आणि नवी मुंबई यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत विविध योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी.
    2. महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद यांच्यामार्फत योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे.
    3. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

    महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावपातळीवर प्रचार व प्रसिध्दी करुन  अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना पुरक पोषण आहार उपलब्ध करुन देण्यात येतो. आरोग्य तपासणी, लसीकरण, संदर्भ सेवा इ. सेवा लाभार्थ्यांना अंगणवाडी केंद्रामार्फत  उपलब्ध करुन देण्यात  येते. महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेचा लाभा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना देण्यात येतो.

    1. ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे पोषण व आरोग्य दर्जा सुधारणे.
    2. बालकांचा शारीरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे.
    3. बालमुत्यू, बालरोग व कुपोषण, शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करणे.
    4. बालविकासाला चालना मिळावी म्हणून शासनाचे विविध विभागांमध्ये धोरण व अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.
    5. महिला व बालकल्याण समिती मार्फत राबविण्यात येणा-या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
    6. ग्रामीण भागातील महिलांच्या उन्नतीसाठी शासनामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची अंमलबजावणी करणे.

    अंगणवाडी केंद्रातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना पुर्व शालेय शिक्षण देणे.

    • लेक लाडकी योजना
    • ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी मध्ये शिकणा-या मुलींना दोन चाकी लेडीज सायकल पुरविणे.
    • ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन पुरविणे.
    • ग्रामीण भागातील मुली व महिलांना शिवणकाम प्रशिक्षण देणे.
    • ग्रामीण भागातील मुली व महिलांना MSCIT प्रशिक्षण देणे.
    • ग्रामीण भागातील अपंग महिलांना लघु उदयोगासाठी अर्थसहायय पुरविणे.
    • शासनामार्फत राबविण्यात येणा-या इतर योजना.

    प्रथम अपीलीय अधिकारीजिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि)-9560314737

    जन माहिती अधिकारी–  सहायक प्रशासन अधिकारी – 9604740016

    सहाय्यक जन माहिती अधिकारीकनिष्ठ सहायक – 9890669894

    पुरस्कार

    पुरस्काराचे शीर्षक* –  पोषण माह मध्ये राज्य स्तरावरुन तृतीय क्रमांक प्राप्त,

    पुरस्काराचे वर्ष*- 2024

    पुरस्काराचे नाव* – पोषण माह मध्ये राज्य स्तरावरुन तृतीय क्रमांक

    पुरस्काराची तारीख- 05.10.2024

    टीम मेंबर – जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि), बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस

    अधिकाऱ्यांचे नाव :- श्री. संजय एकनाथ जोल्हे
    पद :- जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि),
    विभाग :- महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद भंडारा
    दूरध्वनी क्रमांक :- ०७१८४-२५३११०
    फोन नंबर :-
    मेल आयडी – dyceocdzpbhandara@gmail.com