बंद

    महाराष्ट्र लोकसेवा सेवा हक्क अधिनियम, 2015

    महाराष्ट्र लोकसेवा सेवा हक्क अधिनियम, 2015

    आपली सेवा आमचे कर्तव्य

    महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक,गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दिनांक 28-04-2015 पासून अमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्धिष्ट आहे.

    वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किवा नाही यावर देखरेख,समन्वय,सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत.आयोगाचे मुख्यालय नवीन प्रशासकीय भवन,मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

    पात्र नागरिकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियामोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबधितांना वरिष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपील करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपील करता येते.कसुरदार अधिकाऱ्यास प्रती प्रकरण रु. ५000/- पर्यंत दंड होऊ शकतो.

    आपले सरकार सेवा

    राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा तुम्ही पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने मिळवू शकता. सुरुवातीला तुम्हाला पोर्टलवर तुमचे प्रोफाइल तयार करावे लागेल, ‘आपले सरकार’ म्हणजे ‘तुमचे सरकार’. एकदा तुम्ही तुमचे प्रोफाइल तयार केले की, तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता आणि २०० हून अधिक सेवा पाहू शकता.

    ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग सेवा

    1. जन्म प्रमाणपत्र
    2. मृत्यू प्रमाणपत्र
    3. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
    4. दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
    5. नाही थकबाकी प्रमाणपत्र
    6. निराधारासाठी वृद्धापकाळाचा दाखला
    7. मूल्यांकन प्रमाणपत्र

     

    महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेब साईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

     

    लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत अधिसूचित सेवा

     
    लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांची यादी
    अधिसूचित सेवांची यादी