बंद

    पशुसंवर्धन विभाग

    विभागाबद्दल माहिती

    शेतीसाठी निविष्ठा, व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा व कौटुंबिक एकनिष्ठता निर्माण करून ग्रामीण अर्थचक्राला गतिमान करणारा व्यवसाय म्हणजे पशुसंवर्धनाचा व्यवसाय होय. महाराष्ट्राला नेहमीच प्रगतीपथावर ठेवण्यात इथल्या पशुधनाचा वाटा मोठा राहिला आहे. या पशुधनाच्या संगोपन, संवर्धन आणि विकासाची जबाबदारी सांभाळत प्रगत व उन्नत महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान देण्यात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागही नेहमीच अग्रेसर राहिला आहे. पशुसंवर्धन विभागाने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचालीतही ग्रामीण भागातील प्रत्येक समाजघटकाला सर्वांगीण विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याचे काम सातत्यपूर्वक केले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांमुळे आज ग्रामीण भागात विकास आणि प्रगतीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. धवलक्रांतीच्या माध्यमातून विविध योजना, संशोधन व पशुसंवर्धनविषयक उपक्रमांच्या अंमलबजावणीतून ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र आणखी गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग विविध उपक्रम व योजनांच्या माध्यमातून कार्यरत व कटीबद्ध राहिला आहे.

    पशुजन्य उत्पादनांच्या निर्मिती प्रक्रियेत राज्यास अव्वल क्रमांकित करणे, पशुसंवर्धनविषयक जास्तीत जास्त उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, संख्यात्मक पशुधनापेक्षा गुणात्मक पशुधनाच्या वृद्धीस चालना देणे व कालसुसंगत अभिनव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक पशुपालनाची व्यापकता राज्यभर वाढविण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभाग कटीबद्ध राहील. या प्रवासात राज्यातील पशुपालक-शेतकरी बांधवांची साथ निश्चितच मोलाची ठरेल!

    योजना/कार्यक्रम

    1. पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण (एलएचडीसी)
    2. बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प
    3. उत्पादक भागीदारी उपप्रकल्प
    4. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना
    5. जिल्हा स्तरीय जिल्हा वार्षिक योजना
    6. नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना
    7. सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना
    • पशुसंवर्धनाच्या सुधारित तंत्रज्ञानाद्वारे राज्यामध्ये आर्थिक व पोषणविषयक विकासाची शाश्वती देणे.
    • राज्यातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पशुजन्य पदार्थांची उदा. दूध, अंडी व मांस यांची मागणी व उपलब्धता यात असलेली तफावत दूर करणे व त्याचे माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करणे.

    राज्यासाठी पशुधन धोरण तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन या विभागाचे प्रमुख कार्य आहे. विभागातंर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि पदाधिकारी यांच्या माध्यमातून योजना आणि योजनेत्तर निधीमधून विविध विकासविषयक योजनांची अंमलबजावणी करून हे कार्य पार पाडण्यात येते. विभागाच्या प्रमुख कार्यांमध्ये खालील महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो:-

    1. पशुपैदास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी– कृत्रिम रेतनाव्दारे पशुधनामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून उत्पादकता वाढविणे.
    2. पशुधनाचे रोगराईपासून संरक्षण करुन जास्त दुध उत्पादन, अंडी उत्पादन, मांस, लोकर ही पशुजन्य उत्पादने वाढविणे.
    3. ग्रामीण शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे, शेळी गट, कुक्कुट पक्षी वाटप करुन पुरक उत्पन्नाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणे.
    4. पशुधनास लागणाऱ्या वैरण व पशुखाद्याची उपलब्धता वाढविणे.
    5. पशुधनास लागणाऱ्या लसींची निर्मिती करणे.
    6. प्रसिध्दी व प्रचार कार्यक्रमाअंतर्गत पशुपालकांपर्यंत पशुसंवर्धन विषयक योजनांची माहिती पुरविणे. तसेच राज्य प्रशिक्षण धोरणाची अंमलबजावणी करणे.
    7. पशुसंवर्धन विषयक सेवा व प्रशासकीय सेवा आधुनिक व गतीमान करणेसाठी आवश्यक मनुष्यबळ व पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणे.

    प्रथम अपीलीय अधिकारीजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी – 9823727625

    जन माहिती अधिकारी–     पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) -9975020152

    सहाय्यक जन माहिती  अधिकारीसहाय्यक प्रशासन अधिकारी,-9423688456

    महत्त्वाचे दुवे

    1. पशुपालन आणि डेअरी विभाग, भारत सरकार https://dahd.gov.in
    2. भारत पशुधन अभियान https://bharatpashudhan.ndlm.co.in/
    3. भारतीय जीव जंतू कल्याण बोर्ड https://pib.gov.in/
    4. राष्ट्रीय पशुधन अभियान https://nlm.udyamimitra.in/
    5. पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी https://dahd.gov.in/schemes/programmes/ahidf
    6. राष्ट्रीय दुग्धविकास बोर्ड https://www.nddb.coop/
    7. ई-गोपाला https://web.umang.gov.in/landing/department/e-gopala.html
    8. भारतीय पशुचिकित्सा परिषद https://vci.dahd.gov.in/
    9. जागतिक आरोग्य संघटना, https://www.who.int/
    10. महाराष्ट्र शासन https://www.maharashtra.gov.in/
    11. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प https://www.smart-mh.org/
    12. महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ https://mafsu.ac.in/
    13. कृषि विभाग, महाराष्ट्र शासन https://krishi.maharashtra.gov.in/
    14. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग (सीपीजीआरएमएस) https://pgportal.gov.in

    अधिकाऱ्यांचे नाव :- डॉ. जगन्नाथ देशवट्टीवार
    पद :- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
    विभाग :- पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद भंडारा
    दूरध्वनी क्रमांक :- ०७१८४- २५१५५२
    फोन नंबर :- ९८२३७२७६२५
    मेल आयडी – dahobhandara@gmail.com

     

    मदतीकरीता संपर्क क्रमांक

    टोल फ्री संपर्क क्रमांक : 18002330418

    मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेचा टोल फ्री क्रमांक : 1962