बंद

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

    प्रस्तावना

    केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना सोसायटीची नोंदणी कायदा १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० अन्वये करण्यात आलेली आहे.

    जि.ग्रा.वि.यं. मार्फत दारिद्र्य रेषेखालील जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याकरिता विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अर्थ साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सदर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे करिता शासन निर्णय क्र. जिग्रा २००३/प्र.क्र. १७४३/ योजना – ५ मंत्रालय, मुंबई ४०००३२ अन्वये नवीन कृतीबंध लागू केला आहे.

    विभागाची महत्त्वाची कार्ये

    • केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणे.
    • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनांमध्ये लाभ देणे.
    • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची स्वरोजगारासाठी कर्ज प्रकरणे हाताळणे.
    • लाभार्थींना आपले उत्पन्न वाढविता यावे यासाठी गुंतवणूक किंवा उत्पादक उद्योग धंदे काढण्याच्या दृष्टीने आदर्श योजना तयार करणे.

    1.दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी त्यांना मदत करणे.·

    2.आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या समुहास तसेच बचत गटास बँक समुहामार्फत  आर्थिक सहाय्य उपलब्ध करून आर्थिक स्थिरता प्रदान  देणे.

    3.घरकुल योजनेमार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून मूलभूत सुविधा पुरविणे.

    4.लखपती दीदी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना विविध प्रशिक्षण व आर्थिक पाठबळ  उपलब्ध करून करणे.

    • केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंबलबाजवणी करणे.
    • दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनांनमध्ये लाभ देणे.
    • बचत गटामार्फत महिलाना स्वावलंबी बनवणे (लखपती दीदी योजणेमार्फत प्राप्त  उद्दीष्ट पूर्ण करणे).
    • स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी स्वरोजगार उपलब्ध करून देण्यास आर्थिक मदत करणे व त्यांना कर्ज पुरवठा करण्यास सहाय्य करणे.
    • घरकुल योजनेमार्फत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत उपलब्ध करून त्यांना कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून  देणे.
    • भारत सरकार व महाराष्ट्र शासनातर्फे वेळोवेळी राबविलेल्या विशेष योजनांची अंबलबजावणी करणे. योजनांचे मुख्य् उदेश गाठण्यासाठी व्यक्तीगत आणि गट लाभार्थींसाठी लघुउदयोग सारख्या विकासाच्या सर्व क्षेत्रात गुंतवणूक आणि उत्पादक योजना राबविण्यांसाठी पुरेसे आर्थिक व्यवस्थासपकीय आणि संघटनात्म‍क सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी सर्व कार्यवाही करणे.
    1. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (केंद्र सरकार योजना, भारत सरकार)
    2. रमाई आवास योजना (सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन)
    3. शबरी आवास योजना (आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन)
    4. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय कल्याण, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन)
    5. अटल बंधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण (उद्योग, ऊर्जा आणि समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र सरकार)
    6. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आवास योजना (इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन)
    7. मोदी आवास योजना (इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र सरकार)
    8. पंडित दिनदयाल जमीन खरेदी योजना (PDU) (ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र सरकार)
    9. उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणारे सर्व उपक्रम

    कु.पपीहा किशोरराव पजई

    जन माहिती अधिकारी तथा विस्तार अधिकारी (सां)

    संपर्क क्र. 9503921998

    MSRLM संबंधित सर्व प्रकारच्या योजना तसेच संबंधित कागदपत्रे खालील वेबसाइट

    वर मिळेल.

    https://www.umed.in/

    घरकुल संबंधित सर्व प्रकारची माहिती ,जीआर, वेळोवेळी प्रसिद्ध होणारे शासकीय निर्णय खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे.

    https://www.mahaawaas.org/

    अधिकाऱ्यांचे नाव :- श्री विवेक शेषराव बोंदरे
    पद :- प्रकल्प संचालक
    विभाग :- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा
    दूरध्वनी क्रमांक :- ०७१८४-२५२३०६
    फोन नंबर :- ८०१०४०५७५१
    मेल आयडी – drdabhandara@gmail.com